मिळाला कोट्यावधीचा गुप्त खजिना
जुन्या रहस्यमय थडग्यांशी निगडित कहाण्या वाचण्याचा शौकिन असलेल्या एका इसमाने यातून प्रेरित होत एका प्राचीन मकबऱ्याचा शोध सुरू केला. यादरम्यान त्याला हजारो वर्षे जुने एक थडगे मिळाले, मग त्याने काही गुन्हेगारांसोबत मिळून हे थडगे खोदत गुप्त खजिना बाहेर काढण्याचा प्लॅन आखला. यात तो यशस्वीही झाला, परंतु खजिना विकताना त्याला अटक झाली.
चीनमध्ये एक इसम प्राचीन आणि रहस्यमय थडग्यांच्या कहाण्या वाचून त्यात इतका गुंतून गेला की, त्याने खऱ्या आयुष्यात थडग्यांची लूट करण्याची योजना आखली. मग तो एका प्राचीन दफनभूमीत शिरून ख्रिस्तपूर्व 771 सालातील एक थडगे खोदले आणि त्यातील 20 प्राचीन अमूल्य अवशेष चोरले. मध्य चीनच्या हुबेई प्रांतातील यू नावाचा हा सूत्रधार दरदिनी थडग्यांना लूटण्याचा उल्लेख असणाऱ्या कादंबऱ्या वाचायचा. कहाणी वाचून समाधान न झाल्याने त्याने कहाण्यांमध्ये उल्लेखित जुनी थडगी आणि दफनभूमींवर शोध सुरू केला. काहीही संशयास्पद किंवा अस्पष्ट दावे मिळाल्यास तो स्थानिक काउंटी रिकॉर्डमधून त्याबद्दल माहिती मिळवायचा.
रहस्यमय खजिन्यांच्या कहाण्यांनी प्रभावित
त्याचे सर्वात मोठे आकर्षण कादंबऱ्यांमध्ये वर्णित कथित रहस्यमय थडगी होत्या, ज्यात खजिना लपविण्याचा दावा करण्यात आला होता. याचमुळे त्याने कादंबऱ्यांमध्ये नमूद थडग्यांना लुटण्याचा प्लॅन आखला. मोबाइलवर गुओ राजघराण्याच्या थडग्यांमध्ये पुरातात्विक शोधाविषयी एक नोटिफिकेशन आल्यावर त्याने हा प्लॅन आखला होता. हे क्षेत्र हुबेईमध्ये एक संरक्षित सांस्कृतिक वारसास्थळ आहे. ज्यात पहिल्यांदा उत्खनन 20 वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी एका महामार्गाच्या निर्मितीदरम्यान करण्यात आली होती.
मोबाइलमधील नोटिफिकेशन
मोबाइलवर आलेल्या नोटिफिकेशनमध्ये उत्खननात मोठया संख्येत कांस्य कलाकृती मिळाल्याचे नमूद होते. यामुळे यू याची रुची जागृत झाली आणि त्याने पहिल्यांदा अवैध उत्खननाचा प्रयत्न केला, लीने त्वरित चेन नावाचा इसम आणि अन्य सहकाऱ्यांना मदतीला घेतले होते.
संशोधनानंतर चोरी
या शोध आणि चोरीला मूर्त रुप देण्यापूर्वी सर्वप्रथम आसपासच्या पर्वतरांगेच्या लेआउटचे अध्ययन केले होते. यानंतर एक तपास उपकरण आणि लुओयांग फावडे (जे खोदकामात वापरले जाणारे विशेष चिनी उपकरण)चा वापर करत हळूहळू थडग्यात जेथे खजिना लपविला होता, तेथे पोहोचलो. दोन आठवड्यांच्या गुप्त शोधानंतर अखेर एका थडग्याचे प्रवेशद्वार दिसले, मग ते सावधपणे तोडले, असे यू याने चौकशीदरम्यान मान्य केले.
कांस्याच्या 20 प्राचीन मूर्ती
दोन रात्रीदरम्यान तिन्ही आरोपींनी अथक परिश्रमातून 20 कांस्य कलाकृती शोधल्या. यानंतर यूने ली नावाच्या एका इसमाशी संपर्क साधत त्या विकण्याचा प्रयत्न केला, याबद्दल सुगावा लागताच पोलिसांच्या एका टीमने खरेदीदार असल्याचे भासवून यू याची भेट घेतली, त्याच्याकडे 20 प्राचीन कलाकृती होत्या, याची किंमत 5 कोटी रुपये इतकी होती. या चोरीप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.









