केरळमधील घटनेने खळबळ
वृत्तसंस्था/ कोची
केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका इसमाने स्वत:च्या पत्नीची हत्या करत आत्महत्या केली आहे. एर्नाकुलम जिल्ह्यातील पिरावोम येथे रविवारी सकाळी ही घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
संबंधित इसमाने स्वत:च्या दोन मुलींवरही हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या युवतींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमी युवतीने घरात घडलेल्या प्रकाराची माहिती सर्वप्रथम स्वत:च्या शेजाऱ्यांना दिली होती, ज्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केले होते. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून घेण्यात आला असून तपास हाती घेण्यात आला आहे. हत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असून याकरता जखमी युवतींची जबाब महत्त्वाचा ठरणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.









