प्रतिनिधी / इस्लामपूर
येथील गुंड प्रकाश महादेव पुजारी (२४) याचा चौघांनी धारधार शस्त्राने डोक्यात वार करुन निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री बहे नाका येथे घडली. गॅंगमध्ये सहभागी होत नाही,म्हणून त्याचा गेम केला.
हल्लेखोर हे मृत प्रकाश याचे जवळचे मित्र आहेत.गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के , अकीब पटेल व त्यांचा अनोळखी एक साथीदार यांचा या गुन्ह्यात समावेश आहे. प्रकाश पुजारी हा संशयित गजराज पाटील व त्याचे साथीदार यांच्या गँग मध्ये सामिल होत नाही,म्हणून त्याच्यावर राग होता.त्यातून सतत धुसफूस सुरू होती. प्रकाश त्याच्या मित्रांच्या सोबत बारमध्ये दारू पीत बसला होता. तेथे येवून गजराज पाटील याने प्रकाश बरोबर वादावादी केली. त्यानंतर गजराजने प्रकाशच्या डोक्यावर हल्ला चढवला. तर सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी साथीदार यांनी लाथाबुक्यानी आणि दगड व विटाने मारहाण करून त्याचा खून केला. याबाबतची फिर्याद रोहन रविंद्र इच्चुर याने दिलीआहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली