
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षणखात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक विभाग फुटबॉल स्पर्धेत बेळगाव तालुक्मयाच्या इस्लामिया संघाने सर्वोदय खानापूर संघाचा 4-0 असा पराभव करून तर मुलींच्या गटात सेंट जोसेफ संघाने बैलहोंगल संघाचा 1-0 असा करून विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
सेंट मेरीज स्कूलच्या मैदानावर आयोजित प्राथमिक विभाग जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात सर्वोदय खानापूर संघाने बेळगाव ग्रामीण कडोली हायस्कूलचा 1-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सर्वोदयतर्फे पास्कल परेराने एकमेव गोल केला. अंतिम सामन्यात इस्लामिया संघाने सर्वोदय संघाचा 4-0 असा पराभव केला. इस्लामियातर्फे मारूफ, रिहाब पटवेगार (2), अब्दुल किल्लेदार यांनी गोल केले. मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट जोसेफ बेळगाव संघाने बैलहोंगल संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर शहर पीईओ जे. बी. पटेल यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी बी. सी. सावनूर, ईर्षाद अहमद पालेगार, खलिल कोतवाल, तौफिक कादरी, इरफान मुल्ला आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून मानस नायक, आकाश मंडोळकर, महेश हागिदाळे, सचिन पिल्ले यांनी काम पाहिले.









