ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या एका एजंटला गुजरातच्या कच्छमधून राष्ट्रीय अन्वेषण विभागाने अटक केली.
रजकभाई कुम्हार असे अटक करण्यात आलेल्या ISI एजंटचे नाव असून, तो मुंद्रा डॉकयार्ड येथे पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. तो गुजरातच्या पश्चिम कच्छ येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रजकभाई याचे संबंध जानेवारी महिन्यात ISI शी संबंधित उत्तरप्रदेशातील चांदौली येथून अटक करण्यात आलेल्या राशीद नावाच्या व्यक्तीशी जुळतात. राशीदच्या तपासादरम्यान रजकभाईचे नाव समोर आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
राशीदने ISI ला भारतातील अस्थापनांची माहिती पाठवली होती. तसेच लष्कराशी संबंधित काही छायाचित्रे पाठवली होती. रजकभाई त्याला या कामात मदत करत असल्याचे तपासात समोर आले आहे.









