ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला भारतीय बनावटीच्या विमानांची माहिती पुरवणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यास एटीएसने अटक केली आहे.
दीपक शिरसाट (वय 41)असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर कलम 3, 4, आणि 5 शासकीय गुपिते अधिनियम1923 अन्वये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिरसाट हा भारतीय बनावटीची विमाने बनविणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीमधील कर्मचारी आहे. तो पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात होता. तो ISI ला नाशिक येथील विमानकारखान्याची आणि विमानाच्या संवेदनशील तांत्रिक तपशिलाची गुप्त माहिती पोहचवत होता.
आरोपी शिरसाटचे 3 मोबाईलहँडसेट, 5 सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यातआले असून, विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे पाठवण्यात आले आहे.









