वृत्तसंस्था/ मुंबई
येथे झालेल्या एनएससीआय बॉललाईन स्नूकर स्पर्धेच्या मॅरेथॉन अंतिम लढतीत इशप्रीत छ•ाने पंकज अडवाणीचा 10-7 असा पराभव करून जेतेपद पटकावले.
बेस्ट ऑफ 19 फॉरमॅटच्या फायनलमध्ये इशप्रीतने 62-25, 4-77, 59-35, 7-65, 68-12, 57-66, 19-60, 90-0, 33-70, 0297, 99-16, 75-35, 75-27, 68-31, 83-10, 6-122, 73-72 अशा फ्रेम्सनी विजय मिळविले. एका टप्प्यावर अडवाणी 4-3 असा आघाडीवर होता. पण इशप्रीतने आपला खेळ उंचावला आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन करीत पंकजवर मात केली. 16 व्या प्रेमध्ये पंकजने 122 चा एकमेव शतकी ब्रेक नोंदवला. नंतर 17 व्या फ्रेममध्ये इशप्रीतने सामना संपवला. मागील वर्षी इशप्रीतला पंकजकडून 8-10 असा पराभव स्वीकारावा लागला होता तर मार्चमध्ये झालेल्या सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धेत तो पंकजकडून 6-8 असा पराभूत झाला होता.









