वृत्तसंस्था/ चेन्नई,तामिळनाडू
येथील राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय विक्रम मोडीत टाकला, गुरुवारी चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025.या स्पर्धेत 21 वर्षीय भारतीय खेळाडू विशाल टीकेने 45.12 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. त्याने 2019 च्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील मुहम्मद अनस याहियाचा 45.21 सेकंदांचा मागील राष्ट्रीय विक्रम मागे टाकला आहे.
पॅरिस 2024 ऑलिम्पिक राजेश रमेश (46.04 सेकंद) आणि विक्रांत पांचाळ (46.17 सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. मे महिन्याच्या सुरुवातीला कोरिया प्रजासत्ताकातील गुमी येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेमध्ये मिश्र रिलेमध्ये 4 बाय 400 सुवर्ण आणि पुरुष 4 बाय 400 मीटरमध्ये रिलेमध्ये रौप्यपदक जिंकणऱ्या भारतीय रिले संघांचा विशाल हा भाग होता.पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत 45.57 सेकंद वेळ नोंदवून तो चौथ्या स्थानावर राहिला आणि गुमीमध्ये त्याचे वैयक्तिक पदक थोड्या फरकाने हुकले, जे त्याचे मागील वैयक्तिक सर्वोत्तम ठरले.
राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे 64 वे संस्करण 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान टोकियो येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंसाठी अंतिम पात्रता स्पर्धा हि महत्वाची ठरणार आहे. पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत टोकियो 25 साठी प्रवेशची वेळ 44.85 सेकंद होते.
आशियाई क्रीडा विजेत्या अन्नू राणी (भालाफेक), अनिमेश कुजूर (पुरुष 200 मीटर), मुरली श्रीशंकर (लांब उडी), तजिंदरपाल सिंग तूर (गोळीफेक), तेजस्विन शंकर (उंच उडी) आणि प्रवीण चित्रवेल (तिहेरी उडी) यासह अव्वल तारे या आठवड्याच्या अखेरीस खेळतील.
राष्ट्रीय आंतर-राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 निकाल-
महिला पोल व्हॉल्ट: 1. बरनिका एलांगोवन (4.10 मी), 2. मारिया जेसन (4.05 मी), 3. सत्या तमिलरासन (4.00 मी). पुरुष 400 मी: विशाल टी.के (45.12 से); 2. राजेश रमेश (46.04) 3. विक्रांत पांचाळ (46.17 से) महिला शॉटपुट: 1. काचना चौधरी (15.75 मी), 2. विधी (15.30 मी), 3. शिक्षा (15.18 मी) महिला 400 मी: 1. देवयानीबा झाला (53.37 से); 2. अनंखा (53.84),3. प्राची (53.96) पुरुष डिस्कस थ्रो: 1. किरपाल सिंग (55.00मी); 2. निर्भय सिंग (53.62 मी); 3. उज्ज्वल चौधरी (53.23 मी) पुरुष 1500 मी: 1 युनुस शाह (3:41.22); 2. अजय सरोज (3:41.55); 3. अर्जुन वास्कले (3:42.86)महिला 1500मी: 1. पूजा (4:10.68); 2. लिली दास (4:12.47); 3. अमनदीप कौर (4:21.37)पुरुष डेकॅथलॉन: 1. स्टॅलिन जोस (7052 गुण); 2. कुशल मोहिते (6976 गुण); 3. कमल झनख (6820 गुण).









