वृत्तसंस्था/ सेरब्रुकेन (जर्मनी)
येथे सुरू असलेल्या हायलो खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशान भटनागर आणि तनिषा पेस्टो यांचे मिश्र दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात चीनच्या फेंग झी आणि हुआंग पिंग या जोडीने इशान आणि तनिषा यांचा 21-13, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत भारताचे लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, समीर वर्मा, आकषी काश्यप, सायना नेहवाल, मालविका बन्सूर, सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी आपला सहभाग दर्शविला आहे. सदर स्पर्धा 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान खेळविली जात आहे.









