बिना नाईक यांची भाजपवर टीका
पणजी : केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराथचे मुख्यमंत्री असताना महागाईवर मोठ मोठी भाषणे ठोकत होते. आता महागाई गगनाला भिडत असताना भाजपाचे मोदी सरकार काय करीत आहेत असा प्रश्न काँग्रेसच्या महिला प्रध्याक्ष बिना नाईक यांनी उपस्थित केला आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्य लोक होरपळत आहेत. त्यामुळे हा अमृतकाळ नसून सर्वसामान्यांसाठी विनाषक काळ आहे. असेही नाईक म्हणाल्या. येथील काँग्रेस भवनात काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत बिना नाईक बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत अनुराधा नाईक, झरीना शेख, सॅलेट मिरींडा, ब्रेटा कार्दोज उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी त्यांच्या निकडवर्गीयांना आणि धनाड्या लोकांसाठी अमृतकाळ असेल मात्र सर्व सामान्य माणसांचा महागायिने कणा मोडला आहे. असे बिना नाईक यांनी सांगताना प्रंतप्रधान तसेच भाजपावर जोरदार टिका केली.
भाजीपाला असो किंवा अन्य कडधान्य शेतकऱ्यांकडून घेताना कमी भावात घेतला जाते, मात्र ते सर्वसामान्य लोकांना तेच धान्य किंवा भाजीपाला बाजारातून अवाढव्य दरात घ्यावा लागतो हे असे का असा प्रश्न बिना नाईक यांनी उपस्थित केला आहे. भाजप सरकार शेतकऱ्यां बरोबरच समान्य लोकांनाही त्रासदायक ठरलेले आहे. जनता सुजाण आहे. योग्य वेळी धडा शिकवेल हे लक्षात ठेवा असा इशार त्यांनी दिली. आता पंतप्रधान महागाईबाबत किंवा मणीपूरमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत एक शब्दही बोलत नाही. 60 ऊपये लिटर पेट्रोल असताना त्यांना महाग वाटत हाते आता शंबरच्या वर पोचत आहे त्याचे काय. सिलिंडर 425 ऊपये होता तेव्हा महाग होता आता एक हजार शंभर ऊपये झाला त्याचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.









