वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिला आयएएस अधिकाऱ्याची छेड काढल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका आयआरएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. दिल्लीच्या पार्लमेंट पोलीस स्थानकात महिला अधिकाऱ्याने तक्रार नोंदविली होती. आरोपी अधिकारी हा भारतीय महसूल विभागात कार्यरत आहे. आरोपी सोहेल मलिक हा 2010 च्या तुकडीचा आयआरएस अधिकारी आहे. दिल्लीतच कार्यरत महिला आयएएस अधिकाऱ्याने त्याच्या विरोधात छेडछाड, जीवे मारण्याची धमकी देणे, अश्लील टिप्पणी करणे यासारखे गंभीर आरोप केले आहेत. प्रारंभिक तपासानंतर पोलिसांनी आरोपी सोहेल मलिक अंसारीला अटक केली आहे.
तक्रारदार महिला अधिकाऱ्याचे सोहेल मलिकसोबत व्हॉट्सअॅपद्वारे संभाषण झाले होते. दोघेही एका व्हॉट्सअॅप ग्रूपचे सदस्य होते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केले आहे.









