कोल्हापूर
पाटबंधारे विभागाच्या शासकीय रहिवासी इमारतीच्या गेटची तोडफोड करण्यात आली आहे. एका शासकीय कर्मचाऱ्यानेच ही तोडफोड करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोखंडी गजाने इमारतीच्या प्रवेशद्वाराची तोडफोड केली.
कर्मचाऱ्यांच्या दबंगगिरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. संबंधित वारणा इमारतीमधील महिला दहशतीत आहेत. महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे, मात्र यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.








