गोकुळ दूध संघाच्या लेखापरिक्षणावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. गोकुळ दूध संघाच्या कारभारात अनियमितता आढळली आहे. त्याचा खुलासा देण्याचे आदेश ही गोकुळ दूध संघाला दिले आहेत. मात्र, सरकारकडे अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल आल्यास त्यात अनिमित्त आढळली तर कारवाई करणार असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीवरून बोलताना त्यांनी चांगलीच आग पाखड केली. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था वेगळी आहे. हा पक्ष नेहमी तळ्यात राहिला आहे. त्यांच्या दिवसा रात्री गाठीभेटी सुरू असतात. आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. असेही विखे पाटील म्हणाले.
महसूल विभागात पैसे घेऊन बदल्या केल्या जातात, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला होता. त्यावर विखे पाटील यांनी, राजू शेट्टी उसाचे आंदोलन सोडून महसूल विभागाकडे का आले? तसेच बदलीत पैसे घेत असतील तर त्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान ही महसूल मंत्री यांनी केले.
मंत्री विखे पाटील शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, गोकुळ मधील व्यवहाराबाबत तक्रारी प्राप्त झाले आहेत. या तक्रारींवर चौकशी करण्याचे आदेश दिले दिले होते. त्यानुसार लेखापरीक्षणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालामध्ये अनियमितता दिसून आली आहे. या अनियमितता संदर्भात गोकुळ प्रशासनाकडे खुलासे मागवले आहेत. याबाबतचा अंतिम अहवाल अद्याप माझ्याकडे प्राप्त झालेला नाही. पण प्राथमिक अहवाला मधील अनियमितता स्पष्ट झाल्यास गोकुळ वर कारवाई करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.









