अवेळी झोपण्याचा जंक फूड खाण्याशी संबंध
अनियमित झोपेमुळे लोकांचा आहार अनारोग्यकारी असतो आणि यामुळे आजारांची जोखीम वाढते. एका अध्ययनानुसार झोपण्याच्या सवयीतील किरकोळ बदल देखील माणसांच्या पोटात असलेल्या बॅक्टेरियांमध्ये अशाप्रकारचे बदल करतात, जे आरोग्यासाठी योग्य नसतात. याचमुळे नियमित झोपेवर भर दिला जात असतो.

किंग्स कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांनी 1000 प्रौढांवर अध्ययन केले आहे. या अध्ययनात आठवड्यादरम्यान झोपेत 80 मिनिटांचा फरक देखील माणसांच्या पोटात आढळून येणाऱ्या बॅक्टेरियांच्या प्रकारांना प्रभावित करू शकतात असे आढळून आले आहे. वीकेंडच्या तुलनेत आठवड्यातील उर्वरित दिवसांमध्ये वेगवेगळ्या वेळी झोपण्याला आणि जागे राहण्याला सोशल जेटलेगचे नाव देण्यात आले आहे.
सोशल जेटलेग
सोशल जेटलेग अशा बॅक्टेरियांना प्रोत्साहित करू शकतात, ज्यांचा आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव असतो. याचे एक कारण हे देखील असू शकते की सोशल जेटलेगयुक्त लोकांचा स्वाभाविक स्वरुपात आहार तितका पोषक अन् आरोग्यदायी नसतो. या लोकांमध्ये आढळून येणाऱ्या बॅक्टेरियाच्या 6 प्रजातींपैकी 3 खराब आहार, स्थुलत्व, जळजळ आणि स्ट्रोकच्या धोक्याशी निगडित आहेत,असे अध्ययनाशी निगडित पोषण वैज्ञानिक के. बर्मिंगहम यांनी म्हटले आहे. झोप योग्य नसल्याने पसंत प्रभावित होते आणि लोकांमध्ये अधिक कार्बोहायड्रेट किंवा जंक फूड्स खाण्याची इच्छा निर्माण होते असेही अध्ययनातून समोर आले आहे.
जंक फूड खाण्याची इच्छा तीव्र
सोशल जेटलेगने पीडित 16 टक्के लोकांमध्ये क्रिस्पी, चिप्स, शुगर ड्रिंक्स सेवन करण्याची शक्यता अधिक दिसून आली आहे. बर्मिंगहम यांच्यानुसार झोप अन् जागे राहण्याची वेळ स्थिर ठेवणे तसेच एक संतुलित आहार घेतल्याने आजारांची जोखीम कमी होते.
योग्य ताळमेळ आवश्यक
झोप, डायट आणि गट बॅक्टेरियादरम्यान जटिल संबंध आहे. अशा स्थितीत झोप अन् झोपेतून जागे होण्याची वेळ सर्वकाही नियमित असायला हवे. हेच पोटातील बॅक्टेरियाद्वारे संबंधिताच्या आरोग्याला प्रभावित करत असते. यातील योग्य ताळमेळ आजारांपासून बचावासाठी महत्त्वपूर्ण आहे.









