मुंबई :
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन(आयआरएफसी)चा समभाग गेल्या दोन सत्रात 28 टक्के इतका दमदार वाढल्याची माहिती मिळते आहे. कंपनीच्या बाजार भांडवलानेही 80 हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. बीएसईवर सोमवारी आयआरएफसीचा समभाग इंट्रा डे दरम्यान 64.50 रुपयांवर विक्रमी स्तरावर पोहचला होता. जुलैमध्ये या कंपनीचा समभागाचा भाव 32 रुपये इतका होता. सोमवारीच हा समभाग जवळपास 14 टक्के इतका उसळी घेताना दिसला.