ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद 1000 कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटात इन्कमिंग सुरूच आहे. ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांपासून ते तळागाळातील कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही शिंदे गटाने मोठा गट फोडला आहे. शिवसेनेचे भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद 1000 कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (सोमवारी) ठाण्यातील टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. या प्रवेश सोहळय़ानंतर सय्यद यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : धुळ्यात मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट