वृत्तसंस्था/ डब्लीन (आयर्लंड)
तीन सामन्यांच्या होणाऱया न्यूझीलंड विरूद्ध वनडे क्रिकेट मालिकेसाठी क्रिकेट आयर्लंडने शनिवारी 14 जणांचा संघ जाहीर केला असून अँडी बेलबिरेनीकडे कर्णधारपद सोपविले आहे.
सदर मालिका 10 ते 15 जुलै दरम्यान आयर्लंडमध्ये मॅलेहिडे येथे खेळविली जाणार आहे. आयसीसीच्या विश्वचषक सुपर लीग स्पर्धाअंतर्गत ही मालिका होणार असून महत्त्वाचे 30 गुण मिळविण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न राहतील. आयर्लंड संघामध्ये स्टीफेनी डॉहेनी आणि अष्टपैलू ग्रॅहम हय़ूम यांचा समावेश करण्यात आला असून क्रिकेट आयर्लंडने अलीकडेच या दोन्ही खेळाडूंबरोबरचे करार कायम ठेवले आहेत.
आयर्लंड संघाने यापूर्वी वनडे क्रिकेट मालिकेत बलाढय़ विंडीजचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. आयर्लंड संघातील अनुभवी विल्यम पोर्टरफिल्ड निवृत्त झाला असून आगामी मालिकेसाठी मॅकेर्थी, रॉक आणि व्हाईट यांना वगळण्यात आले आहे.
आयर्लंड संघ- अँड्रय़ू बेलबिरेनी (कर्णधार), मार्क ऍडेर, कॅफर, डिलेनी, डॉपेल, डॉहेनी, हय़ूम, जोस लिटल, मॅकब्रिने, सिमी सिंग, पॉल स्टर्लिंग, टेक्टर, टकेर, क्रेग यंग.









