वृत्तसंस्था/ डब्लिन
येत्या एप्रिल महिन्यात आयर्लंडचा क्रिकेट संघ लंकेबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका गॅलेच्या मैदानावर खेळणार असल्याची घोषणा आयर्लंड क्रिकेट मंडळाने मंगळवारी केली आहे.

लंकन क्रिकेट मंडळाकडून या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. यापूर्वी या दौऱ्यामध्ये एक कसोटी सामना दोन वनडे सामने खेळवण्याचे निश्चित केले होते. पण त्यानंतर या कार्यक्रमात बदल करण्यात आला आणि उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यावर शिक्कामोतर्ब करण्यात आला. उभय संघातील पहिली कसोटी 16 एप्रिलला तर दुसरी कसोटी 24 एप्रिलला सुरू होणार असून हे दोन्ही सामने गॅलेच्या मैदानावर होतील. या कसोटी मालिकेसाठी आयर्लंडचे नेतृत्व अँड्य्रू बेलबिरेनीकडे सोपवण्यात आले आहे.
आयर्लंड संघ- अँड्रयू बेलबिरेनी (कर्णधार), अॅडेर, कॅम्फर, मरे कोमिन्स, जॉर्ज डॉक्रेल, फियोन हँड, ह्युमे, हम्फेर्स, टॉम मेयस, मॅकब्रिने, मेकॉलम, मूर, टेक्टर, टकेर आणि बेन व्हाईट.









