मुंबई
लाभांश देण्याच्या घोषणेनंतर सोमवारी शेअरबाजारात आयआरसीटीसीचा समभाग दौडताना दिसला आहे. कंपनीचा समभाग जवळपास 3 टक्के एनएसईवर वाढत 676 रुपयांवर व्यवहार करत होता. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने आर्थिक वर्ष 2023 करीता 2 रुपये प्रति समभाग लाभांश जाहीर केला आहे. कंपनीची 26 ऑगस्टला 24 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली होती. त्यात लाभांशाची घोषण केली गेली.









