IRCTC Madhdya Pradesh Tour Package : मध्य प्रदेश हे भारतातील एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. जिथे तुम्ही धार्मिक, ऐतिहासिक सहलीपासून ट्रकिंग ते जंगलसफारीचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यानंतर येथील हवामान प्रवासासाठी अनुकूल होते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर किंवा डोंगराळ ठिकाणांना भेट देऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, खजुराहो, ओरछा या ठिकाणांना नक्की भेट देवू शकता. तेही अतिशय कमी खर्चात. IRCTC ने प्रवासाठी एक स्किम आणली आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. नेमकी कोणती स्किम आहे जाणून घेऊया.
काय आहे पॅकेज
पॅकेजचे नाव- मध्य प्रदेशचा वारसा
पॅकेजचा कालावधी – ५ रात्री आणि ६ दिवस
प्रवास कशाने कराल – रेल्वेने
डेस्टिनेशन कवर्ड– ग्वाल्हेर, खजुराहो, ओरछा
तुम्हाला ही सुविधा मिळेल-
-प्रवासासाठी ट्रेनचे तिकीट उपलब्ध असेल.
-या पॅकेजमध्ये तुम्हाला फक्त नाश्त्याची सुविधा मिळेल.
-दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण तुम्हाला स्वतःला द्यावे लागेल.
-रोमिंगसाठी एसी वाहनाची सुविधा उपलब्ध असेल.या पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.
प्रवासासाठी इतके शुल्क लागेल-
-या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला २९,०५० रुपये द्यावे लागतील.
-दोन लोकांना प्रति व्यक्ती १५,३८० रुपये शुल्क भरावे लागेल.
-तीन लोकांना प्रति व्यक्ती ११,५६० रुपये शुल्क भरावे लागेल.
मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेडसह८४६० रुपये आणि बेडशिवाय ७६८० रुपये मोजावे लागतील.
तुम्ही असे बुक करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता.
आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते.
पॅकेजशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









