Iran Hijab Protest : इराणमध्ये हिजाबवरून सध्या वातावरण तापलं आहे. एका अमेरिकन महिला न्यूज अँकरने हिजाब घालण्यास नकार दिल्याने इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार दिला आहे. मुलाखतीची सर्व तयारी पूर्ण झाली असताना अँकरने हिजाब घालण्यास नकार दिला. यावरून राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार दिल्याचा दावा सीएएन वृत्तसंस्थेच्या महिला पत्रकार क्रिस्टीन एमनपोर (Christiane Amanpour) यांनी केला आहे.
नेमकं काय घडल
इराणमध्ये हिजाब सक्तीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या एका महिलेला पोलीसांनी अटक केली होती. तिचा पोलीस कोठडीत धक्कादायक मृत्यू झाला. यानंतर राजधानी तेहरान आणि मशहादसह अन्य शहरांमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या. अनेक महाविद्यालयं आणि विद्यापीठांनी सरकारचा निषेध केला. या आंदोलनात अनेक ठिकाणी महिलांनी केस कापून हिजाब जाळला. दरम्यान आता इराणच्या राष्ट्रपतींनी न्यूज अँकरने हिजाब घालण्यास नकार दिल्याने मुलाखत देण्यास नकार दिला. यावरून इराणमधील वातावरण आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









