वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
इटलीच्या सारा इराणी आणि आंद्रेया वावासोरी या जोडीने येथे झालेल्या अमेरिकन खुल्या मिश्र दुहेरीच्या स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावित पारंपरिक जोडीच अव्वल असल्याचे दाखवून दिले. मागील वर्षीही त्यांनी जेतेपद पटकावले होते. इटलीच्या सारा इराणी आणि आंद्रेया वावासोरी या जोडीने मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात तृतिय मानांकीत जोडी पोलंडची इगा स्वायटेक आणि नॉर्वेचा कास्पर रूड यांचा 6-3, 5-7 (10-6) अशा सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत इराणी आणि वावासोरी या इटालियन जोडीने या स्पर्धेतील चार सामने जिंकून 10 लाख डॉलर्सचे बक्षीस पटकाविले.
न्यूयॉर्कमधील या स्पर्धेत गतवर्षीच्या तुलनेत या 2025 सालात विजेत्यांच्या बक्षीस रकमेत विक्रमी वाढ स्पर्धा आयोजकांनी केली आहे. अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आयोजकांनी पहिल्यांदाच यावर्षी मिश्र दुहेरीची स्पर्धा घेण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि त्यामध्ये मिश्ा़dर दुहेरीतील पारंपरिक जोड्यांना वगळून एकेरीतील स्पेशालिस्ट असणाऱ्या नवीन जोड्या करून त्यांना संधी देण्यात आली. या स्पर्धेच्या स्वरुपात बदल केल्याबद्दल इराणी-वावासोरी यांच्यासह अन्य टेनिसपटूंनी टीका केली होती. पण इराणी आणि वावासोरी या पारंपरिक जोडीने या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावत आपले म्हणणे सिद्ध करून दाखविले.
आर्थर अॅश स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम फेरीतील सामन्याला टेनिस शौकिनांनी गर्दी केली होती. अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा आयोजकांनी मिश्र दुहेरीची स्पर्धा पहिल्यांदाच घेवून ती मोठ्या प्रमाणात यशस्वी केली. या मिश्र दुहेरीच्या स्पर्धेमध्ये 8 संघांचा समावेश होता. प्रत्यक्षात 2025 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला येत्या रविवारपासून प्रारंभ होत आहे. मिश्र दुहेरीच्या स्पर्धेसाठी टेनिसपटूंच्या एकेरीतील मानांकनाचा विचार करत एकूण 16 संघांना पात्र ठरविण्यात आले होते. त्यामध्ये 8 संघांना वाईल्डकार्ड दिले होते. इटलीच्या सारा इराणी आणि वावासोरी या जोडीने मिश्र दुहेरीचे जेतेपद पुन्हा आपल्याकडेच राखले. 2018-19 मध्ये असा विक्रम बेथनी मॅटेक सँड्स आणि जेमी मरे यांनी केला होता.
या मिश्र दुहेरीच्या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एकेरीतील विजेते स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, एम्मा राडुकानु, सर्बियाचा जोकोविच, जपानची नाओमी ओसाका आणि रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव यांना हा पत्करावी लागली. या स्पर्धेत बुधवारी झालेल्या तीन सामन्यांना शौकिनांची चांगलीच गर्दी झाली होती. दुपारच्या सत्रामध्ये पावसाचा अडथळा आल्याने काही सामने अर्धवट स्थितीत थांबवावे लागले होते. या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात इराणी आणि वावासोरी या जोडीने ख्रिस्टेन हॅरिसन आणि डॅनियली कॉलिन्स यांचा 4-2, 4-2 असा पराभव केला होता. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत स्वायटेक आणि रूड या जोडीने टॉपसिडेड जोडी जेसिका पेगुला आणि जॅक ड्रेपर यांचा 3-5, 5-3 (10-8) असा पराभव केला.
द्वितीय मानांकीत स्वायटेकने आतापर्यंत सहावेळा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली होती. तर कास्पर रूडने तीन प्रमुख स्पर्धांमध्ये एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. पण रूड आणि स्वायटेक या जोडीला अंतिम सामन्यात सारा इराणी आणि वावासोरी यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. महिला दुहेरीमध्ये सारा इराणी ही अव्वल टेनिसपटू म्हणून ओळखली जाते. तिने रॉबर्टा व्हिन्सीसमवेत ग्रँडस्लॅम जेतेपद पटकाविले होते. तसेच 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिने जस्मीन पाओलिनीसमवेत सुवर्णपदक घेतले होते. इगा स्वायटेकने गेल्या सोमवारी सिनसिनॅटी स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. त्यानंतर ती अमेरिकन टेनिस स्पर्धेत कास्पर रूडसमवेत 4 लाख अमेरिकन डॉलर्स रकमेची मानकरी ठरली.









