नौदलाला पुरविली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रs अन् ड्रोन्स : अमेरिकेकडून अनेक युद्धनौका तैनात
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणने आखातील होर्मुजनजीक तैनात स्वत:च्या नौदलाला ड्रोन आणि हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रs पुरविली आहेत. या भागात अमेरिकेच्या सैनिकांच्या उपस्थितीचा दाखला देत इराणच्या सैन्याने आमचा देश स्वत:च्या सागरी मार्गांची सुरक्षा करण्यासाठी पूर्ण क्षमता बाळगून असल्याचे विधान केले आहे.
अमेरिकेने काही दिवसांपूर्वी होर्मुज सागरी मार्गातून जाणाऱ्या जहाजांमध्ये शस्त्रसज्ज सैनिक तैनात करण्याची घोषणा केली होती. इराणकडून जहाजांना असणाऱ्या धोक्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. इराणने अमेरिकेच्या या कृतीला प्रत्यत्तुर दिले आहे. ओमानचा उपसागर अन् हिंदी महासागरात अमेरिकेचे काय काम, असा प्रश्न इराणने उपस्थित केला आहे.

20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक
इराणने होर्मुज सागरी मार्गानजीक शेकडो बॅलेस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्रs तैनात केली आहेत. होर्मुजमधून जगातील 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते. या भागात इराणच नव्हे तर अमेरिका देखील सैनिक अन् शस्त्रास्त्रs तैनात करत आहे. अमेरिकेने स्वत:चे ए-10 थंडरबोल्ट 2 लढाऊ विमाने, एफ-16 आणि एफ-35 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. याचबरोबर अमेरिकेच्या अनेक युद्धनौका देखील या भागात पोहोचल्या आहेत.
अमेरिकेने इराणसोबत 1988 मध्ये झालेल्या युद्धादरम्यान देखील अशाप्रकारे या भागात शस्त्रास्त्रs तैनात केली नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिका आता या भागात सर्वाधिक सक्रीय दिसून येत आहे. तर इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सनी बुधवारी आखातातील वादग्रस्त बेटावर सैन्याभ्यास केला होता.
इराणकडून जहाज जप्त
अमेरिका आणि इराणदरम्यान ओमानच्या उपसागरात 2019 पासून जहाजांना जप्त करण्यावरून वाद सुरू आहे. 2018 मध्ये तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा आण्विक करार संपुष्टात आणला होता. तेव्हापासून दोन्ही देश अनेक ठिकाणी परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्याचे दिसून येते. आखातातील होर्मुज पास देखील अशाच ठिकाणांपैकी आहे. या भागात आता एफ-16 लढाऊ विमान जहाजांना सुरक्षा पुरविणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे आखातात इराणला आव्हान देण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याची उपस्थिती वाढणार आहे. इराणने मागील महिन्यात ओमानच्या उपसागरात एका व्यावसायिक जहाज जप्त केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. इराणला 2 व्यावसायिक ऑइल टँकर जप्त करण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या नौदलाने केला होता.









