तेहरान
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने वादग्रस्त हिजाब आणि शुद्धता कायद्याला स्थगिती दिली आहे. हा कायदा मागील आठवड्यात शुक्रवारी लागू होणार होता, परंतु देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या विरोधामुळे या कायद्याची अंमलबजावणी स्थगित करण्यात आली आहे. हा कायदा अस्पष्ट असून यात सुधारांची गरज आहे. याच्या काही तरतुदींवर पुन्हा विचार करण्यात येणार असल्याचे राष्ट्रपती मसूद पजशकियान यांनी म्हटले आहे. या कायद्यानुसार स्वत:च्या डोक्यावरील केस, हात आणि पाय पूर्णपणे न झाकणाऱ्या महिलेला 15 वर्षे तुरुंगवास आणि दंड ठोठावण्याची तरतूद आहे. अॅमनेस्टी इंटरनॅशनल समवेत अनेक मानवाधिकार संघटनांनी या कायद्यावर टीका केली होती.









