Iran Hijab Row : इराणमध्ये पोलिसांच्या मारहाणीमुळं २२ वर्षीय महसा अमीनी हीचा मृत्यू झाल्यानं महिला संतापल्या आहेत. हिजाबला हवेत फेकत आणि केस कापत त्यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला हळूहळू वेगळं वळण लागलं आहे. पोलीस आणि प्रशासन महिलांवर आक्रमक कारवाई करत आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये किमान ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी ७०० हून अधिक महिलांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, इराण ह्युमन राइट्सनं दावा केलाय की, सुरक्षा कर्मचारी वगळता मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या ५४ आहे. मझांदरान आणि गिलान प्रांतांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इथं आंदोलन करणाऱ्या महिलांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावाही अधिकार गटांनी केला आहे.
सोशल मीडियावर बंदी
एवढंच नाही तर इराण सरकारनं व्हॉट्सअॅप, स्काईप, लिंक्डइन आणि इन्स्टाग्राम यांसारख्या संवाद माध्यमांवर बंदी घातली आहे. या कारवाईत शेकडो कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही अटक करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजननं मृतांची संख्या ४१ असल्याचं सांगितलं. तर इराण सरकारच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेला आग लावली असून त्यामुळं सर्वांवर ही कारवाई करण्यात येत आहे, असं स्पष्ट केलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









