इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांची रशियाने कठोर निंदा केली आहे. परंतु रशिया यापुढे जात सैन्य मदत करावी अशी मागणी इराणची आहे. परंतु रशिया केवळ वक्तव्य करण्यापुरती मर्यादित राहिला आहे. यामागील कारण रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनीच दिले आहे. तटस्थतेचे मोठे कारण इस्रायलमध्ये मोठ्या संख्येत रशियन वंशाच्या लोकांचे वास्तव्य आहे. रशिया या संघर्षात तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहे, कारण इस्रायलमध्ये रशियन भाषिक लोक मोठ्या संख्येत राहतात असे पुतीन सांगितले आहे. इस्रायलमध्ये रशियाशी संबंधित सुमारे 20 लाख लोक राहतात. यामुळे इस्रायलला रशियन भाषिक लोकांचा देश म्हटले जाऊ शकते. रशियाच्या आधुनिक इतिहासात आम्ही याची नेहमीच खबरदारी घेत आलो आहोत असे पुतीन म्हणाले.









