मुंबई
केरळातील इएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ 3 नोव्हेंबरला बाजारात खुला होणार आहे. सदरची बँक ही 1992 पासून कार्यरत असून ग्रामीण आणि उपनगरी भागातील ग्राहकांना वित्त पुरवठा करण्याचे काम करते आहे. 57-60 रुपये प्रति समभाग अशी किंमत ठेवण्यात आली आहे. 3 नोव्हेंबरला सबस्क्रिपशनसाठी आयपीओ खुला होणार असून 7 रोजी बंद होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 463 कोटी रुपये उभारणार आहे.









