नवी दिल्ली
ाायपीओ लिस्टिंगसाठीचा कालावधी 3 दिवसांचा करण्याचा प्रस्ताव बाजारातील नियामक सेबीकडून आला आहे. यासंदर्भात लोकांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्याची माहिती आहे. शेअरबाजारातील नियामक सेबीने आयपीओ बंद झाल्यानंतर कंपनीच्या शेअरबाजारातील लिस्टींगसाठी मर्यादा 6 दिवसावरून 3 दिवस करण्याचा विचार केला आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव सेबीने सादर केला असून 3 जूनपर्यंत लोकांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. लिस्टिंग आणि ट्रेडिंग याबाबतीतील कालमर्यादा घटवल्याने समभाग सादरकर्ते व गुंतवणूकदार या दोहोंना मुदत कमी केल्याचा लाभ होणार असल्याचे म्हटले जात आहे. सादरकर्त्यांना लवकर निधी मिळू शकेल, ज्यामुळे त्याला व्यापार करणे सोपे होईल व गुंतवणूकदारांनाही सुरुवातीचा लाभ उठवता येईल, असे सेबीने प्रस्तावात म्हटले आहे.









