पुणे / वार्ताहर :
इंडीयन प्रिमीयर लीगच्या (IPL) कलकत्ता नाईट रायडर्स (KKR) विरूध्द रॉयल चॅलेंज बेंगळूर (आरसीबी) या क्रिकेट मॅचवर बुकिंग घेणाऱ्या आरोपीला येरवडा परिसरातून जेरबंद करण्यात आले आहे. आकाश धरमपाल गोयल (वय 30, रा, लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना आकाश गोयल आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेत असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार येरवडा स्मशानभूमी शेजारी असलेल्या भोला पान शॉपजवळ त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या मोबाईलची पाहणी केली असता तो 31 मार्च 2023 पासून इंडीयन प्रिमीयर लीगच्या क्रिकेट मॅचच्या कालावधीत सटटा घेत असल्याचे आढळले. त्याच्याकडून सट्टा घेण्याकरीता वापरत असलेला मोबाईल हॅन्डसेट पोलिसांनी जप्त केला आहे.
गोयल याच्याकडे सट्टा खेळणाऱ्या चार जणांविरूद्ध येरवडा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहा. पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर हे अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : नॉट रिचेबल अजित पवार पोहोचले थेट सोन्याच्या दुकानात









