कराड :
क्रिकेटचा महासंग्राम म्हणून जगाच्या पातळीवर ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचा सिझन सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्यांची पोलखोल सलग तिसऱ्या वर्षी पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ही कारवाई केली. संशयित आरोपींकडून या गुह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून साखळीच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईला रवाना झाले आहे. या पथकाकडून मुंबईत ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
आयपीएल मॅचेस दरवर्षी भरवल्या जातात. या काळात सट्टाबाजार तेजीत येतो. गेल्या तीन ते चार वर्षांत कराडला आयपीएल सट्टा घेणाऱ्यांवर आणि लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याची नोंद आहे. यंदाही हा सट्टा लावला जाणार याची माहिती पोलिसांना होती. मात्र मोठी साखळी पकडण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसांनी सोमवारपासून छाप्याला सुरुवात केली. गत काही दिवसांपासून शहरात काही जण ‘आयपीएल’वर सट्टा लावत असल्याची मा†हती पा†लसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस सट्टेबाजांचा शोध घेत होते. रा†ववारी याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सोमवारी पा†लसांनी दोन ठिकाणी छापे टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
सट्टेबाजारातील साखळीचा शोध घेण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. तसेच कोणाच्या वरदहस्ताखाली सट्टेबाजार चालवला जातो, याचीही मा†हती पोलीस घेत आहेत. अटक केलेल्या संशयित आरोपींकडे पा†लसांकडून गोपनीयरित्या तपास केला जात आहे. त्यांच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे तपासासाठी पोलीस पथक मुंबईला रवाना झाले असून, त्या ठिकाणी छापासत्र सुरू आहे. या गुह्यात आणखी काही जणांचा सहभाग निष्पˆ झाला आहे. त्यामुळे गुह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.








