पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या वाघोली परिसरातील एका वेअर हाऊसचा सिमेंटचा पत्रा फोडून चोरटय़ांनी 65 लाख 61 हजार रुपयांचे 105 आयफोन लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वैभव सुदाम झेंडे (रा. वाघोली, पुणे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार वैभव झेंडे यांच्या कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन लिमिटेड या कंपनीचे वेअर हाऊस वाघोली या ठिकाणी आहे. 16 जुलै रोजी अज्ञात आरोपींनी या वेअर हाऊसचा सिमेंटचा पत्रा फोडून आतमध्ये प्रवेश केला. या वेअर हाऊसमधील रेडींग टर्न इंडिया लिमिटेडचे आयफोन कंपनीचे एकूण 65 लाख 61 हजार रुपये किंमतीचे 105 मोबाईल हँडसेट चोरटय़ांनी लांबवले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एन. जाधव पुढील तपास करत आहेत.