सुरुवातीची किंमत 79,990 रुपये : 48 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा : टाइप सी पोर्ट
कॅलिफोर्निया
अॅपल कंपनीने आपल्या वंडरलस्ट या कार्यक्रमात आयफोन 15 मालिका आणि अॅपल वॉच यांची मालिका 9 लाँच केली आहे. याशिवाय अॅपल वॉच अल्ट्रा 2 याचेही सादरीकरण केले आहे. कंपनीने प्रथमच चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट सादर केले आहे.
यावेळी आयफोन-15 मध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. आयफोन-15 आणि 15 प्लसमध्ये एस ए 16 बायोनिक चिप आहे. त्याचवेळी, आयफोन-15 प्रो आणि प्रो मॅक्सला ए17 बायोनिक चिप मिळेल.
भारतात आयफोन-15 128 जीबी मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे आणि आयफोन 15 प्लस 128 जीबी मॉडेलची किंमत 89,900 रु. आहे. त्याचवेळी, आयफोन-15 प्रोच्या 128 जीबी ची किंमत 1,34,900 रु. असेल.
आयफोन आणि घड्याळ उपलब्ध
नवीन आयफोन 15 सप्टेंबरपासून संध्याकाळी 5.30 वाजता प्री-ऑर्डर करता येईल. नवीन अॅपल वॉच आता प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. हे देखील 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल.
फॉक्सकॉनकडून भारतात आयफोन 15 ची निर्मिती
तैवानची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी फॉक्सकॉन भारतातील त्यांच्या तामिळनाडू प्रकल्पामध्ये आयफोन 15 चे उत्पादन करत आहे. उत्पादनाला गती देण्यासाठी फॉक्सकॉनने चेन्नईस्थित प्रकल्पात उत्पादनातही वाढ केली आहे.
अॅपल दरवर्षी सप्टेंबरमध्ये नवीन आयफोन सीरिजसह इतर अनेक उत्पादने लाँच करते. फॉक्सकॉन भारतातील त्यांच्या तामिळनाडू प्रकल्पामध्ये अॅपल कंपनीचा आयफोन 15 बनवत आहे.









