2 ट्रिलीयनचा खर्च करणार ः चेअरमन श्रीकांत वैद्य यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2046 पर्यंत शून्य टक्के कार्बन उत्सर्जन करण्याचे ध्येय तेल उत्पादक कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी)यांनी समोर ठेवले आहे. या योजनेकरिता कंपनी आगामी काळात विविध टप्प्यांमध्ये 2 ट्रिलीयन रुपये खर्च करणार आहे.
कंपनीची नुकतीच 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली होती. त्यात कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत वैद्य यांनी ही माहिती दिली. कमीतकमी उत्सर्जनासह कार्बनचे प्रमाण कमी करण्याच्या ध्येयाकडे कंपनीची आगामी काळामध्ये वाटचाल असणार आहे.
योजना, आराखडा तयार
शून्य टक्के कार्बन उत्सर्जनाचे ध्येय साध्य करण्यासाठी या संदर्भातील योजना आणि आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने आगामी काळात करणार असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. 2046 पर्यंत वरील उद्दिष्ट नक्कीच साध्य केले जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









