3000 कोटीचा संरक्षण करार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत सरकार सैन्यशक्तीला आणखी मजबूत करण्यासाठी भारत डायनॅमिक्सकडून (बीडीएल) जवळपास 2000 ते 3000 कोटी रुपयांच्या निधीतून 500 इनवार रणगाडाविरोधी निर्देशित क्षेपणास्त्रs खरेदी करण्याचा विचार करत आहे. या क्षेपणास्त्रांचा वापर टी-90 रणगाड्यांवर केला जात आहे. हा करार भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवरील सैन्यतयारीला मजबूत करणार आहे. ही खरेदी ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ पुढाकाराला चालना देणार आहे. भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर टी-90 रणगाड्यांना तैनात करण्यात आले असल्याने तेथे सैन्यसज्जता या करारामुळे आणखी मजबूत होणार आहे.
भारत सरकार जवळपास 500 इनवार रणगाडाविरोधी निर्देशित क्षेपणास्त्रांची ऑर्डर देणार आहे. ही क्षेपणास्त्रs अचूक लक्ष्यभेद करणारी आहेत. भारतीय सैन्य यापूर्वीच या क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. आता आणखी क्षेपणास्त्रs खरेदी करण्यात आल्याने भारताची रणगाडा रेजिमेट आणखी मजबूत होणार आहे.
इनवार क्षेपणास्त्रांना रणगाडा प्लॅटफॉर्मवरून डागण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालय 500 क्षेपणास्त्रांच्या ऑर्डरला अंतिम रुप देत आहे. या करारावर एकूण 2 ते 3 हजार कोटी रुपयांदरम्यान खर्च होण्याची अपेक्षा आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.









