श्री स्थापेश्वर भजन सेवा संघाचे आयोजन
प्रतिनिधी
बांदा
डेगवे येथील श्री स्थापेश्वर भजन सेवा मंडळाच्या वर्षपूर्ती निमित्त रविवार १ सप्टेंबर रोजी निमंत्रितांची भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्री स्थापेश्वर मंदिरात सायंकाळी ४ वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. यात जिल्ह्यातील ६ दिग्गज संघ सहभागी झाले आहेत.स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५,५५५ रुपये, द्वितीय ३,३३३ रुपये, तृतीय २,२२२ रुपये आहे. तसेच तीन संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येईल. तसेच उत्कृष्ट गायक, तबला, पखवाज, हार्मोनियम, कोरस, झांज, गौळण तसेच उत्कृष्ट स्थापेश्वर गजर यांना वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली आहेत. सर्व विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह देण्यात येईल.स्पर्धेत श्री माऊली भजन सेवा संघ इन्सुली (बुवा वैभव राणे), चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ले (बुवा अनिकेत भगत), रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुडाळ (बुवा हर्षद ढवळ), श्री साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ निरवडे (बुवा नरेंद्र बोंद्रे), श्री देव समाधी पुरुष भजन मंडळ मळगाव (बुवा गौरांग राऊळ) आणि श्री देवी कालिका प्रासादिक भजन मंडळ कारीवडे (बुवा सुदित गावडे) ही सहा भजनी मंडळे सहभागी झाली आहेत. ध्वनी संयोजन सुभाष शिरोडकर यांचे असून राजा सामंत यांचे बहारदार निवेदन असेल. भजन प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्थापेश्वर भजन सेवा संघ व डेगवे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.









