न्हावेली / वार्ताहर
मातोंड रामेश्वर मंदिर येथे समस्त गावकर मंडळी,देवस्थान कमिटी व श्री देवी सातेरी युवक कलाक्रिडा मंडळ,मातोंड यांच्या संयुक्त विद्यमाने हरिनाम सप्ताहानिमित्त शनिवार २ व रविवार ३ रोजी सायंकाळी ६ वाजता भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१ रुपये,द्वितीय ३००१ रुपये,तृतीय २००१ रुपये,तसेच उत्तेजनार्थ १००१ रुपये वैयक्तिक पारितोषिक उकृष्ट गायक ५०१,उकृष्ट पखवाजवादक ५०१,उकृष्ट झांजवादक ५०१,उकृष्ट कोरस ५०१ व सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी व देवस्थान कमिटी मातोंड व श्री देवी सातेरी युवक कलाक्रिडा मंडळाने केले आहे.









