ओटवणे प्रतिनिधी
कारिवडे- देऊळवाडी येथील श्री देवी कालिका प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी १७ व १८ ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरीय आणि कारीवडे गाव मर्यादित निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी १७ ऑक्टोंबर रोजी होणारी भजने पुढीप्रमाणे सायंकाळी ७ वाजता श्रीदेवी भवानी प्रासादिक भजन मंडळ (पालववाडी कारीवडे बुवा मनोज परब), रात्री ७:५० वाजता श्री देव हेळेकर प्रासादिक भजन मंडळ (पेडवेवाडी कारीवडे बुवा संतोष सावंत), रात्री ८: ४० वाजता श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ (आंदुर्ले बुवा अथर्व होडावडेकर), रात्री १० वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ (पिंगुळी बुवा प्रसाद आंबडोसकर), रात्री १०:५० वाजता श्री सनामटेंब प्रासादिक भजन मंडळ (सांगेली बुवा खेमराज सनाम), रात्री ११ ४० वाजता कारीवडे ग्रामस्थ भजन मंडळ (कारीवडे )
बुधवारी १८ ऑक्टोंबर रोजी होणारी भजने पुढीप्रमाणे सायंकाळी ७ वाजता सावंत प्रासादिक भजन मंडळ (भैरववाडी कारीवडे बुवा रोहित सावंत), रात्री ७:५० वाजता श्री देवी कालिका प्रासादिक भजन मंडळ (गावठणवाडी कारीवडे बुवा सुदीप गावडे), रात्री ८: ४० वाजता श्री गवळदेव प्रासादिक भजन मंडळ (गवळीवाडी कारीवडे बुवा अजित कांबळी), रात्री १० वाजता मुसळेश्वर भजन मंडळ (मळेवाड बुवा योगेश मेस्त्री), रात्री १०:५० वाजता श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (पिंगुळी बुवा रूपेश यमकर), रात्री ११ ४० वाजता स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ (तांबोळी बुवा अमित तांबुळकर)
या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ४००१ रूपये, द्वितीय पारितोषिक ३००१ रूपये, तृतीय पारितोषिक २००१ रूपये तर कारीवडे गाव मर्यादित भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५०० रूपये, द्वितीय पारितोषिक १००१ रूपये, तृतीय पारितोषिक ५०१ रूपये तसेच दोन्ही भजन स्पर्धेतील उत्कृष्ट हार्मोनियम वादक, पखवाज वादक, गायक, झांज वादक, कोरस यांच्यासाठी वैयक्तिक पारितोषिके आणि आणि स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आकर्षक सन्मान चिन्ह ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उद्द्घाटन मंगळवारी सायंकाळी ६ वाजता होणार असुन त्यानंतर सात वाजता भजन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी कालिका प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश गावकर, सचिव सुखाजी लिंगवत, उपाध्यक्ष शंभा खडपकर यांनी केले आहे.









