न्हावेली / वार्ताहर
श्री साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळ,निरवडे झरबाजार आयोजित कै. विलास तानावडे कै.दयानंद काळसेकर यांच्या स्मरणार्थ साटम महाराज मंदिर निरवडे येथे गुरुद्वादशीनिमित्त शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . सायंकाळी ५ वाजता उद्धाटन व ६ वाजता भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
—- पुढीलप्रमाणे सहभागी संघ सायंकाळी ६ वाजता श्री पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ,वेत्ये ( बुवा – प्रथमेश निगुडकर ) सायंकाळी ७ वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा – प्रसाद आमडोसकर ) रात्री ८ वाजता नवतरुण प्रासादिक भजन मंडळ,माणगाव ( बुवा – ओंकार कुंभार ) रात्री ९ वाजता दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ,वैभववाडी ( बुवा – विराज तांबे ) रात्री १० वाजता विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ,मातोंड ( बुवा – दिपक मेस्री ) रात्री ११ वाजता विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ,आंदुर्ले ( बुवा – अर्थव होडावडेकर ) रात्री १२ वाजता सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ,जानवली ( बुवा – दुर्गेश मिठबावकर ) रात्री १ वाजता लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ,असरोंडी ( बुवा – विशाल सावंत ) रात्री २ वाजता लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ,कणकवली ( बुवा – योगेश मेस्री ) रात्री ३ वाजता श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ,फोंडाघाट ( बुवा – हेमंत तेली ) हे संघ सहभागी होणार आहे. प्रथम पारितोषिक ७००१ रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिक ५००१ रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिक ३००१ रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक १००१ रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक १००१ रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उकृष्ट हार्मोनियम १००१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट पखवाज १००१ रुपये व सन्मानचिन्ह ,उकृष्ट तबला १००१ रुपये व सन्मानचिन्ह , उकृष्ट गायक १००१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट झांजवादक १००१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट कोरस १००१ रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.लाभ घेण्याचे आवाहन श्री साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळाने केले आहे.









