
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आधुनिक काळातील दिग्गज क्रिकेटपटूंपैकी विराट कोहलीला उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मंगळवारी मिळाले. या महत्त्वाच्या प्रसंगाची जोरात तयारी सुरू असून अनेक प्रमुख दिग्गजांना व मान्यवरांना आमंत्रणे देण्यात आली आहेत.
या कार्यक्रमात मान्यवर राजकीय नेते, खेळाडू, इतर ख्यातनाम आणि उल्लेखनीय व्यक्ती एकत्र येणार असून त्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंना आधीच आमंत्रित करण्यात आले आहे.









