संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरेंनी घेतली भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई संस्थेच्या कॅन्सर इस्पितळाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना उद्घाटन समारंभासाठी निमंत्रित केले आहे.
कॅन्सर रोखण्यासाठी केएलई संस्थेचा लढा सुरू आहे. यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त 300 खाटांचे कॅन्सर इस्पितळ उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावे, अशी विनंतीही राष्ट्रपतींना करण्यात आली. राष्ट्रपतींनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तारीख कळविण्यात येईल, असे राष्ट्रपतींनी सांगितले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.









