सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेता एजाज खान हा स्वत:ची सीरिज ‘अदृश्यम’च्या दुसऱ्या सीझनसह परतणार आहे. स्पाय थ्रिलर सीरिज ‘अदृश्यम : द इनविजिबल हीरोज’च्या पहिल्या सीझनमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसून आली होती. या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे.
या सीझनमध्ये देशासमोर मोठा धोका असल्याचे आणि देशाच्या सुरक्षेसाठी रवि वर्मा एक सिक्रेट एजेन्सीत सामील होत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. दिव्यांका त्रिपाठीच्या जागी या सीझनमध्sय पूजा गौर ही अभिनेत्री दिसून येणार आहे. या सीझनमध्ये रवि वर्मासोबत आणखी काही अंडरकव्हर एजंट दिसून येतील.
या सीरिजमधील ही भूमिका माझ्यासाठी वेगळी ठरली आहे. यात दुर्गा ही व्यक्तिरेखा मी साकारत असून ही केवळ एका अधिकाऱ्याची भूमिका नसून ती एक निडर योद्धा आहे. ती ज्या आव्हानांना सामोरी जाते, ते अत्यंत धोकादायक आहेत. सीरिजमध्ये अॅक्शन आणि रोमांच असून प्रेक्षकांनी याचा अनुभव घ्यावा असे पूजा गौरने म्हटले आहे. अदृश्यम या सीरिजचा पहिला सीझन सोनी लिववर प्रदर्शित झाला होता. दुसरा सीझन देखील सोनी लिववर 4 एप्रिल रोजी स्ट्रीम केला जाणार आहे.









