मारुती सुझुकीची नवी गाडी : किंमत 25 लाखाच्या आत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मारुती सुझुकीच्या नव्या गाडीबाबतची झलक नुकतीच दिसून आली असून तिची उत्सुकता आता ग्राहकांची आणखी वाढली आहे. ‘इनव्हिक्टो’ या नव्या गाडीबाबतचे फोटो पाहायला मिळाले आहेत. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, न्यू ग्रँड विटारा व हायरायडर या गाड्यांना टक्कर देणारी ही मारुतीची कार असेल असे सांगितले जात आहे. अधिकृतरित्या ही नवी कार 5 जुलैला सादर केली जाणार असल्याचे समजते. कारचे डिझाइन खूप सुंदर असणार आहे. हेडलाइटस हे नेक्सा सिग्नेचरच्या थ्री ब्लॉक डीआरएलएसप्रमाणे असतील तर बंपर नव्या डिझाइनने युक्त असणार आहे. ग्रँड विटाराच्या निर्मितीप्रमाणे ‘इनव्हिक्टो’ या गाडीची निर्मिती करण्यात येणार आहे. इनव्हिक्टो ही गाडी टोयोटाच्या सहकार्यातून बेंगळूर बाहेरच्या प्लांटमध्ये तयार होत आहे.
स्पर्धा आणि किंमत
ही गाडी बाजारात आली की टोयोटाच्याच हायक्रॉसशी स्पर्धा करणार आहे. इनोव्हा हायक्रॉसची किंमत 25 लाख इतकी असून यापेक्षा इनव्हिक्टोची किंमत ही कमी असणार असल्याचे सांगितले जात आहे.









