मुंबई
शेअरबाजारात अनेक असे समभाग आहेत ज्यांनी अल्पावधीतच गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यामधलाच एक म्हणजे थरमॅक्स लिमिटेडचा समभाग होय. या समभागाने अल्पावधीतच जवळपास 173 टक्के इतका परतावा गुंतवणुकीवर दिला असल्याची माहिती आहे. 21 सप्टेंबर 2020 रोजी 750 रुपये इतका असणारा समभागाचा भाव 17 फेब्रुवारी 2023 रोजी 2049 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या दीड वर्षात या समभागाने 173 टक्क्यांची उसळी घेतली आहे. ज्यांनी त्या काळात 1 लाख गुंतवले असतील त्यांना परतावा म्हणून 2.73 लाख रुपये मिळाले आहेत.









