बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, म्युच्युअल फंड व चॅनल पार्टनर एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या सहकार्याने हॉटेल नेटिव्ह येथे ‘गुंतवणूकदार जागरुकता’ कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, कॉर्पोरेट सल्लागार आणि प्रशिक्षक उदय तारदाळकर, प्रादेशिक व्यवस्थापक एम. एन. कुलकर्णी, लोकमान्य म्युच्युअल फंडचे व्यवस्थापक संदेश कुमठेकर, आयटी प्रमुख सुनील मुतकेकर, विमा प्रमुख राहुल पाटील, व्यवस्थापक गणेश पवार, मुंबईचे प्रादेशिक व्यवस्थापक रमेश शिरसाट, एचडीएफसीचे वरिष्ठ प्रमुख अभिमन्यु श्रेयकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी सोसायटीच्या विद्यमान ग्राहकांना तसेच नागरिकांना म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. किरण ठाकुर यांनी सामान्य नागरिकांचे वार्षिक उत्पन्न किमान 40 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यासाठीचे ध्येय असल्याचे सांगितले. कार्यक्रमास लक्षणीय प्रतिसाद लाभला.
Previous Articleटोमॅटोच्या दरात वाढ
Next Article पंढरी परब चौथ्यांदा अध्यक्षपदी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









