प्रतिनिधी/ पणजी
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाने 180 कोटी ऊपयांची प्रस्तावित गुंतवणूक आणि 1,208 लोकांच्या रोजगाराची क्षमता असलेल्या 7 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल (शनिवारी) बोर्डाची 35 वी बैठक झाली. या बैठकीत मंडळाने यापूर्वीच मंजूर केलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आणि व्यवसाय करणे सुलभ करण्याच्या उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर नव्या सात प्रकल्पांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.









