वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
म्युच्युअल फंड क्षेत्रातील जियो ब्लॅकरॉक यांनी आपल्या पहिल्या न्यू फंड ऑफर अंतर्गत 17800 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. कंपनीच्या ओवर नाईट फंड, लिक्विड फंड आणि मनी मार्केट फंड या तिन्ही फंडांमध्ये मिळून गुंतवणूकदारांनी 17800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तीन दिवस चाललेल्या या एनएफओमध्ये 90 हून अधिक मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भाग घेतला होता. तीन दिवसांमध्ये एकंदर 67 हजारपेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असून यामध्ये मोठ्या संस्थांसह सामान्य गुंतवणूकदारही आहेत अशी माहिती मिळते आहे. जिओ ब्लॅकरॉक देशातील ही देशातील आघाडीवरच्या 15 डेट फंड व्यवस्थापन कंपन्यांच्या यादीत समाविष्ट झाली आहे.









