रत्नागिरी :
शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 3 महिलांची तब्बल 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े शिल्पा सुभाष धुंदूर (75, ऱा रत्नागिरी) यांनी या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आह़े त्यानुसार पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक केली असून मंगळवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल़ी.
प्रथम जयेश खानविलकर (ऱा गोडाऊन स्टॉप, नाचणे रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े मार्च ते ऑक्टोबर 2024 या काळात प्रथम याने तक्रारदार तसेच सविता सदानंद बाणे (ऱा शिरगांव-बाणेवाडी) व स्नेहा शरदचंद्र अभ्यंकर (ऱा वरची आळी, रत्नागिरी) यांना शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवल़े त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शिल्पा धुंदूर यांनी 30 लाख रुपये, सविता बाणे यांनी 3 लाख 14 हजार व स्नेहा अभ्यंकर यांनी 1 लाख 75 हजार रुपयांची गुंतवणूक केल़ी.
गुंतवणुकीमधून कोणताही नफा मिळत नसल्याचे लक्षात येताच तक्रारदार व अन्य दोन महिलांनी प्रथम याच्याकडे चौकशी केल़ी यावेळी प्रथम हा उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल़े त्यानुसार या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल़ी पोलिसांनी प्रथम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 318(4) नुसार गुन्हा दाखल केल़ा तसेच अटक करुन न्यायालयापुढे हजर केल़े या प्रकरणी पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून केला जात आह़े








