रत्नागिरी :
जयगड पोलिसात दाखल करण्यात आलेल्या सीताराम वीर व राकेश जंगम यांच्या खूनाचा तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे सोपवला आह़े.
एक वर्ष उलटूनही राकेश जंगम याच्या बेपत्ता प्रकरणाचा उलघडा जयगड पोलिसांना करता आला नव्हत़ा या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सुचनेनुसार दोन्ही खूनाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आह़े
शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात आरोपी दुर्वास मयेकर याने सीताराम लक्ष्मण वीर (55, ऱा कळझोंडी रत्नागिरी) व राकेश अशोक जंगम (28, ऱा वाटद खंडाळा रत्नागिरी) या दोघांचा खून केल्याची कबुली दिली होत़ी दुर्वास याने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, सीताराम वीर हे दुर्वास याची प्रेयसी भक्ती मयेकर हिच्याशी फोनवर अश्लिल बोलत असत़ 29 एप्रिल 2024 रोजी सीताराम हे दुर्वास याच्या सायली बार येथे दाऊ पिण्यासाठी आले हेत़े यावेळी दुर्वास पाटील, विश्वास पवार व राकेश जंगम या तिघांनी सीताराम यांना मारहाण केल़ी यामध्ये सीताराम यांचा मृत्यू झाला होत़ा
सीताराम यांचा खून केल्यानंतर दुर्वास याने चलाखी करत मृतदेह रिक्षामध्ये भरून त्यांच्या घरी नेल़ा तसेच सीताराम हे चक्कर येवून पडले असल्याचा बनाव केल़ा नातेवाईकांनी या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सीताराम यांचा मृत्यू झाल्याचे निश्चित केले व मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आल़े या खून प्रकरणातील संशयित आरोपी राकेश जंगम याला दाऊचे व्यसन होत़े राकेश हा खूनाची वाच्यता करेल, अशी भीती दुर्वास याच्या मनात सतावत होत़ी
राकेश हा खून प्रकरण उघड करेल, या भीतीने दुर्वास याने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतल़ा 6 जून 2024 रोजी दुर्वास याने राकेश याला कोल्हापूर येथे जायचे आहे, असे सांगितल़े कारमधून कोल्हापूरकडे जात असताना दुर्वास पाटील, विश्वास पवार व सांगलीतील नीलेश भिंगार्डे यांनी कारमध्ये राकेश याचा गळा आवळून खून केल़ा तसेच मृतदेह आंबा घाटामध्ये फेकून दिल़ा दरम्यान राकेश हा घरी परतला नसल्याने आई वंदना जंगम हिने 21 जून 2024 रोजी जयगड पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल़ी मात्र या बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांना राकेश याचा कोणताही सुगावा लागला नाह़ी त्यामुळे वर्षभर सीताराम वीर व राकेश जंगम यांच्या खूनाचा उलघडा होवू शकला नाह़ी त्यामुळेच दोन्ही खून प्रकरणाचा तपास जयगड पोलिसांकडून उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे देण्यात आला आह़े
- तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी
भक्ती मयेकर खून प्रकरणात अटक करण्यात आलेला दुर्वास पाटील, विश्वास पवार व सुशांत नरळकर यांना 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होत़ी त्यानुसार शहर पोलिसांकडून तिनही आरोपींना गुऊवारी पुन्हा न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े यावेळी न्यायालयाने तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल़ी








