Hasan Mushrif ED Raid : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरातील चौकशी पूर्ण झाली आहे. तब्बल साडेनऊ तासाने ईडीचे अधिकारी घराबाहेर पडले. सोबत कागदपत्रे व साहित्य घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.आज सकाळी 7 वाजल्यापासून ईडीकडून कागदपत्रांची तपासणी सुरु होती. हसन मुश्रीफ घरी नसताना ईडीने चौकशी केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
ईडीचे अधिकारी घराबाहेर पडताच कार्यकत्यांनी मुश्रीफ यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र मुश्रीफ घरी नसल्याने कार्यकर्त्याना शांततेने घरी जाण्याचं आवाहन करण्यात आलं. गैबी चौकात मात्र कार्यकर्त्यांकडून भाजप आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
गेल्या दोन महिन्यात हसन मुश्रीफांच्या निवासस्थानी तिसऱ्यांदा छापा पडला. सरसेनापती संताजी घोरपडे कथित घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरु होती. 40 हजार शेतकऱ्यांच्याकडून जे पैसे घेतले होते, त्यासंदर्भातील आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. त्यानंतर मुश्रीफांच्यावर मुरगुडात गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
हसन मुश्रीफ यांच्यावर कोणते आरोप आहेत
2020 साली अप्पासाहेब नलवडे कारखाना चालवण्याचं नियमबाह्य कंत्राट घेतल्याचा आरोप
ब्रिक्स इंडिया कंपनीला अनुभव नसताना कंत्राट दिलं.
ब्रिक्स इंडिया कंपनी मुश्रीफ यांच्या जावयाची
जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रूपयांचं नियमबाह्य कंत्राट
2012 मध्ये मुश्रीफांनी प्रत्येकी दहा हजार गोळा केले.
पैसे घेऊन कोणालाही सभासदत्वाची प्रमाणपत्र दिली नाहीत.
आर्थिक लाभ, नाममात्र दरात साखर देण्याचं खोटं आश्वासन दिलं
मुश्रीफ कुटुंबीय, जावई यांनी मिळून 158 कोटींचा घोटाळा केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









