राष्ट्रीय महिला फेडरेशनच्यावतीने मागणी
बेळगाव : खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. आपण 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर होऊ, असे त्यांनी सांगितले आहे. प्रज्ज्वल यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रीय महिला फेडरेशनने केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी निवेदन दिले असून या निवेदनावर राज्य खजिनदार कला सातेरी तसेच कार्यकारी सदस्या मीरा मादार याशिवाय उमा माने, कला कार्लेकर, सुलेखा मकानदार, शोभा होसमनी, व्हन्नव्वा करेन्नावर, भागव्वा यांच्या सह्या आहेत.









